तुझ्याच दर्शनासाठी दत्ता शोधित आले वाट ॥धृ॥
त्रैमूर्ती तव रूपमनोहर तुला बघाया आतुर अंतर । तुषार्त माझे मन हे भरले लोचन कांठोकांठ ॥१॥
त्रिगुणात्मक तूं दीन दयाळु । मज वेडीचा करी सांभाळ । तुझ्या पदाशी सदैव माझी पडू द्यावी निरगांठ ॥२॥
तूच निववीरे भवतापातून, पैलतिरी ने भवसिंधूतून, तुझ्याविणारे कोण उतरवी अवघड हा यमघाट ॥३॥
पुन्हा पुन्हा मी पदर पसरते तृप्त मनाने मागून घेते, एक वार तरी मज गुरु राया, दावी रूप विराट ॥४॥