म्हणे यशोदा पाणी पी रे कृष्णा । होईल मोडशी किरे तुला ॥धृ॥
तिचा छंद का एवढा तुजला, काय केले रे तिने तुला ॥१॥
राधे घरी जाऊनी चर चर खाऊनी, दिवसा तीन तीन चार वेळा ॥२॥
आली राधा जल घेऊनी, तिच्या हाताने पाणी प्याला ॥३॥
माय मी भक्तीचा भुकेला, विकलो गेलो की, राधिकेला ॥५॥
कंद कौतुके करूनी दाखवी, राधा लहान कृष्ण मोठा झाला ॥६॥