सुंदर हा कुसूम हार अर्पीते तुला सुमने मी पुजीत से तुज सी घननिळा ॥धृ॥
स्वानंदची ऋतु वसंत प्राप्त जाहला, सुविचारा शित वायु वाहू लागला, त्यायोगे नव पल्लव समुह दाटला ॥१॥
श्रम सार्थक आजी गडे जाहले पहा, पुष्पे ही टवटवली किती तरी अहा, भ्रमले मी सेविताची गोड परी मला ॥२॥
सुबुद्धी माळिण ही कुशल बहू असे, रात्र दिन एकली ही काम करीत से, चतुर स्त्री ईजसम ही भुवरी नसे, पुर्व पुण्य म्हणूनी हिचा लाभ जाहला ॥ सुंदर हा कुसुम हार अर्पिते तुला ॥३॥