आई माझे अंबिकेची दृष्ट काढू योगे प्रेमे गावू या ॥धृ॥
लाल पैठणी नेसली हिरवी चोळी घातल्याली नाना अलंकार ल्याली ऐसी वेल्हाळ प्रगटली दृष्ट काढूयागे ॥१॥
दिसली किती सुकुमार डोळेईचे पाणीदार नाक सरळ सुंदर दृष्ट काढूयाने ॥२॥
राहसीन गावईचे ठाण भक्ताची ती कुलस्वामीण दासीईच्या चरणी लागे दृष्ट काढूयागे ॥३॥
अंबिकेचे गुण गाता आनंद हा आनंद झाला चित्ता सीता कन्या पार्वती चरणा वरी ठेवू माथा दृष्ट काढूया गे ॥४॥