जयजयजय देवा जय गणराया-माता देई सर्वांलागी तुझे गुण गाया ॥धृ॥
कार्यसिद्धी होण्यासाठी तुला आळवीती धावुनिया येसी वेगे त्वरीत भक्तीसाठी तुझ्या दर्शनाची ओढ लागलीसे जीवा ॥ जय जय जय देवा ॥१॥
भाद्रपदी पक्ष शुद्ध चतुर्थीस येसी दहा दिस राहोनीया परतोनी जासी ठेवुनिया जासी मागे सुखाचाच ठेवा ॥२॥
तुच बुद्धीदाता तुजसी काय रे मागावे लोचनात साठविले ते रूप आठवावे लीन होतसे तव चरणी अर्पितसे काया ॥ जय जय जय देवा जय गणराया मती देई ॥३॥