जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला ॥धृ॥
दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी फोडी पाझर पाषाणाला ॥१॥
घेऊनी पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याचेसाठी देव अंतरी नीज हृदयाला ॥२॥
जनसेवेचे बांधूनी कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपुले हृदय सिंहासन नित भजतो मानवतेला ॥ जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला ॥३॥