त्रिवार जय जयकार जगत जननीचा एक मुखाने करू जय जयकार ॥
कमल उमलता प्रभा फाकते, भ्रमर चाखता मधुकण गळतो, कोटी कोटी कंठातून उमटे उदो उदो ललकार ॥१॥
अमृत ओतीत गोमुख दिसले, पापक्षालिनी जलकण हसले, विष्णूतीर्थ कल्लोळ वर्षती, संजीवनी जलधार ॥२॥
लाल रक्तीया इथे सांडला, हळदी, कुंकू सडा शिंपला । दिव्य परीमल जगदंबेचा झळाळतो दरबार ॥३॥
जय जगदंबे जयजय गर्जिते लाख कंठ ललकारत, मर्द मराठ्यांमध्ये चमकली भवानीची तलवार ॥४॥