श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे ॥धृ॥
अहिल्या दगडामाजी शापित होऊनी युग युग मोजी परीप्रभुच्य पदस्पर्शाने पाषाणासही जीवन झाले ॥१॥
उष्टी बोरे अर्पूनी प्रभुला शबरीने जणू ठाव पाहिला स्विकारूनी ती रघुरायाने देवपणाने बिरुद त्याले ॥२॥
वनवासात जिवन सरले रामायण हो तेथेच घडले आयोध्येस प्रभू परतूनी येता प्रेमाश्रूनी नगर भिजले ॥ श्रीरामाचे चरण धरावे ॥३॥