घेई विडा गोविंद, कृष्ण घेई विडा गोविंद ॥धृ॥
म्हणे भामा वाट पाहते, भक्त काम करी बंद ॥१॥
ताटी रुप्याच्या फळ पक्वान्ने, बघा खाऊनी गुलकंद ॥२॥
केशर कस्तुरी हरी अरगजा लावी उटी सुगंध ॥३॥
त्रयादेश गुणी विडा केला, घाली मुखी गोविंद ॥४॥
भक्त रंगले तव मुख पाहूनी, वाटे ब्रह्मानंद ॥५॥
चला सेजेवरी चुरीन मी स्वकरे । कोमल पदारविंद ॥६॥
सोळा सहस्त्र आठ जणीचा पुरविला तुम्ही छंद ॥७॥
तैसा माझा म्हणते कृष्णा तोडी त्वरे भवबंध ॥
कृष्णा घेईरे विडा गोविंद ॥८॥