रघूनंदन आले आले धरणी माता कानी बोले ॥धृ॥
शिरीषा कुसूमाहूनी कोमल कोमेजून ही काया जाईल, सप्तस्वर्ग तो लवूनी खाली, धरून चालता छत्र साऊली, रवीचा रथ हळू हळू चाले ॥१॥
वृक्ष लतानो हृदय फुलांच्या चरणाखाली रघुरायांच्या पायघड्या ह्या लवकर घाला, माझ्यासाठी सांगा त्याना शिळा अहेल्या हो झाले ॥२॥
पावलातील, धूळ होऊनी बैसली ती संजीवनी, भाळी लावता होईन पावन, आणिक रामा तुझेच दर्शन, धन्य मी पतीता झाले ॥३॥