सुर्यवंशी उत्तानपाद राजा रुपवंती त्यास दोन जाया । कनिष्टेशी अती अंत प्रिती माया, पट्टरानीची पडोन दे छाया । वरिष्टेशी झाला एक पुत्र । भक्तराज वैकुंठ बाळमित्र । सुकुमार आक्रषण पद्म नेत्र । ठाण मान रेखिली जिवी चित्र । पाच वर्ष लोटिली धृवा अंकी, पिता ठावुकी नाही तया लागी । पुसे मातेसी भक्तराज योगी, तात कुठे तो सांग मला वेगी । म्हणे माता तान्हया तात तुझ्या, धराधीश सागती त्यासी प्रजा । येरू बोले पाहिन पिता माझा । नको जाऊ मारीन राज बाजा । पुर्व पुण्य शुभ दिवस उगवला, मुला संगे तो राजगृह गेला । राज दृष्टि तो सन्मुख उभा ठेला, पिता पाहे तो मोह झळपला । अनिवारे मोहास पूर आला उचलोनी माडी बैसविला । बाळ शब्दे खेळवी तनू ज्याला । न सहे ते राणीस कोप आला । उचंबळे क्रोध अग्नी शिका टाकी, कवण बोले बैसला राजा अंकी । राव कैसा खेळवी कौतुके धृव राजा होईल धरा लोकी । धरोनिया शपथ भाव चित्ती, पदे लोटोनी पाडियला खित्ती रडत गेला माऊली जेथे होती, अश्रूपाते हलवी नेत्र पाती, भुजावंती माऊली काय बोले, आम्ही देवाही नाही पुजीले, धृव बोले तो देव कसा आहे । वसे कोठे तो सांग लवलाहे । माय बोले सर्वत्र देव आहे, चराचर य्यापुनी विश्व राहे । ज्या लागी धुंडी ती महायोगी पुर्व पुण्य दर्शन तया लागी । तुझी बुद्धी काय बा वय लहान, तुला कैसे होईल बा दर्शन धृव त्यागीन तरी प्राण, हरी देईना जरी दर्शन, उभा जैसा तैसा निघे वेगे, रडत पाठी लागली माय मागे । धृव गेला रायासी दुत सांगे, राम झाला घाबरा मोह संगे, सर्व संख्याचे मुल बाळ माझे । धृत गेला घेणार राज ओझे । वनी प्राण त्यागीन लोक लाजे । काय जीवे मारियले दुष्ट बाजे, लवलाही लागला धृवापाठी म्हणे बाळा ऐक बा एक गोष्टी । बजावितो तुज धरुनी हनुवटी । तुजवीण दाटला प्राण कंठी । फिरे मागे देई ना एक गांव । धृव बोले देईल देव राव । पांच गांव दिले आण तुझी । धृव बोले देवास लाज माझी । राव बोले देईल एक देश, धृव बोले देईल जगदिश । अर्धराज्य दिधले फिरे मागे, धृव बोले देईजे रमारंगे । सर्व राज्य दिधले फिरे मागे धृव बोले देईजे रमारंगे, स्नेह कारे सोडियला धृव आजी, काळतोंड्या झालो जगामाजी धृव बोले पितासी तात देवा । आता येतो मी लोभ असूद्यावा । हरीभक्तीचा डौल कसा देई, अनुतापे खोदिल्या दिशा दाही । सर्व भावे उभवूनी दोन्ही बाही, म्हणे देवा दे भेट लवलाही । निरंजनी जाऊनी उभा राहे, शोक आक्रोसे करूनी दोन्ही बाहे । दुरोनिया अष्टाक्ष सुत पाहे । तया दृष्टी सायुज्य पदा लाये । जवळ येवोनी पुसे बालकासी लहान वय तू या कोण वनामाजी । पुर्व वृतात सांगे नारदासी, ऐकोनी तोषला देवऋषी । गुरु वाचूनी देव कैसा, सृती संध्या बोलती अशी वाचा । मंत्र राज द्वादशा अक्षराचा ध्रुवा कानी सांगोनी मुनी गेला, जपताची तो ह्रदयी प्रगटला । चतुर्भज सायुज्य घननीळा, तया दृष्टी सन्मुख उभा ठेला । दिव्यरूपे त्या धृव देखियले । नमस्कारोनी मनी पुजियले । देव बोले तू काय इच्छीतोसी । धराधीश की स्वर्ग भागवासी । धृव बोले मज भक्ती सदा देई पद दिले न उठवी दुजी आई । ध्रुवयानी वाहूनिया नेला धृव सत्ताने अढळ बैसविला । चंद्र सूर्य नक्षत्र ग्रह तारा । सप्तऋषी घालीती त्यास फेरा ।