व्रातपति हे स्त्रमथपति जनविद्य महागणपति । लंबोदर हा शिवसुत बघता कर माझे जुळती ॥धृ॥
देहदंड तू विघ्न विनाशक वरदायक असशी । मस्तक ठेवी पुन्हा पुन्हा मी तुझिया चरणासी । सर्व सिंचये वाचन करिता विद्येची सरती ॥१॥
या स्त्रोत्राने पापे सरती सुख दारी येते । महापातके नाश होऊनी प्रसन्न मन होते । सायंकाळी पठनची होता मिळे पाप मुक्ती ॥२॥
प्रातःकाळी वाचन करता शांति मना मिळते । रात्रीच्या पापातुन त्याची मुक्ती ती होते । सकाळ सायंकाळ म्हणता पापे ती जळती ॥३॥