जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोर भार वाहे ॥धृ॥
बाळ सोडूनी ते दिधले कुंतीने जळात, जरी राधिकेच्या घरी ते वाढले सुखात, कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे ॥१॥
भक्त बाळ प्रल्हादाल छळीले पित्याने, नरसिंह रूप त्याला रक्षीले प्रभुने, अलौकिक मुर्ती अजुनी विश्व पाहे ॥२॥
साधू संत कबीराला छळती लोक सारे, पांडुरंग रक्षी त्याला प्राशूनी निखोराआसवेच त्याची झाली दुःखरुप दोहे ॥३॥