येरे मोत्याच्या तुरा पाहूनी तुझे रूप हरली माझी तहान भूक । उद्धव कपट्याचा बोल काय खरा । आम्ही सत्य ना मानून जरा ॥१॥
आता येऊनी म्हणूनी गेला, एक वर्ष झाले त्याला । पुन्हा नाही आम्ही देखिला । वेणू गोरस सावळा । उद्धवा याने त्यागीली आपली आई । याला बापाची ममता नाही । याला इतराची चाड तो काही ॥२॥
कुबजा दासी केली पट्टराणी, भोगी मथुरेची राजधानी । आम्हा म्हणतो अज्ञानी । शेवटी कपट याचे मनी ॥३॥
याची आठवण बाळगलो । घडीघडीला पुरवितो लळा । पाणी येचे आमुच्या डोळा । शेवटी कापला याने गळा ॥४॥
म्हणे विष्णुदास नामा । धन्य धन्य मी गोपीच्या प्रेमा । तुझी पायधुळ दाखविली आम्हा । तुझे गुण वर्णिता न ये सीमा उद्धवा ॥५॥