मुखाने ॐ नमो बोला । धर्म जागृति सतत राखण्या । आळवावे प्रभुला ॥धृ॥
जीवन आपुले व्यर्थ चालले । स्वस्थ कसे बसला । काळ गतीही घिरट्या घाली । भ्रम अंगी जडला । पूर्वपुण्य जे सहज लाभले । नरदेही ज्याला । गुरु मायेने मोहीत केले, धर्म स्विकारण्याला । भारत आपला दरिद्री बनला । सुख नाही त्याला । संत महात्मे झटत राहिले देश सुधारण्याला ॥