जिव माझा लागला पत्र देते तुजला पत्ता माहित नाहिरे गाव तुझे ठावूक नाहीरे ॥धृ॥
असे वाटते एकदा तरी पत्र लिहावे, प्रपंचाचा माया मोह सारा कळवावा कोठे तू अससी पत्र कोठे पाठवू माझ्या कोमल दात्यारे ॥१॥
देव स्तुती सांगती देव आहे गीता भागवतो, साधू हे सांगती संत हे बोलती देव आहे पंढपुरात ॥२॥
भावार्थाचा कागद केला भक्तीची लेखणी देहाचा तो टपोखान मनाचा तो पोष्टमन याच्या हाती पत्र पाठविले पहिला माझा नमस्कार तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र वाचून घ्यावे याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमल दात्यारे ॥३॥