आंस ही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धि चांगली । देऊ तू नको दृष्ट वासना, तूच आवरी आमच्या मना । वागवावया सर्व सुष्टीला शक्ती बा असे एक तूजला । सर्व शक्ती तु सर्व देखणा, कोण जाणतो तुझिया गुणा । माणसे आम्ही सर्व लेकुरे, माय बाप तु हे असे खरे । तुझिया कृपेवीण ईश्वरा, आसरा, आम्हा नाही दुसरा । असशि तूच बा आसरा आम्हा, देई आमुते बुद्धी उत्तमा । जोडूनी करा प्रार्थितो तुला, दावे आमुते मार्ग चांगला ।