माझा हा विठ्ठल येईल हो जेव्हा, जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥धृ॥
त्वरे राऊळासी त्वरे राऊळासी जावोनिया यावे, लवकरी बा ये भोजनासी ॥१॥
ज्ञानेश्वरा घरी असेल बैसला, जावोनिया विठ्ठला पाहे तेथे ॥२॥
भरलीया रागे क्रोध त्याचा साहे लवकरी बा ये भोजनासी ॥३॥
जनी म्हणे देवा चला पुरूषोत्तम, खोळंबला नामा भोजनासी खोळंबला नामा भोजनासी ॥४॥