आरती साईबाबा, जय जय आरती साईनाथा ॥धृ॥
शिरडी नगरी समाधी घेऊनी दर्शन दे संता ॥१॥
भेदभाव हा नसे मंदीरी दाविसी तूं जगता ॥२॥
दिवे दिवाळीत जलात जळती । ऐसी लीला दाविता ॥३॥
निंबवृक्ष खाली बैसूनी । दाविसी खूण भक्ता ॥४॥
दुःखे ही हरती उदी लावूनी । सार्या सरती व्यथा ॥५॥
सद्गुरु माझे तुम्हीच असूनी । ठेवितो चरणी माथा ॥६॥