गोदाकाठी माझ्या इथल्या प्रभू अवतरले, उमटली रामाची पाऊले, फिरत तू असशी वनवासी कंदमुळे ती वनी शोधीतसी कधी भुकेले कधी थकलेले रामप्रभू पाहिले ॥१॥
कांचन मृग तो पाहूनी तेथे पाठलाग तू केला येथे जानकीस या हरीण करता अश्रू ओघळले ॥२॥
जागोजागी कणाकणांतून अश्रू प्रभूचे इथे सांडोनी जानकीस या शोधीत फिरले रामप्रभू पाहीले ॥३॥