तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता । विश्व विनायक मोरया । संकटी रक्षी शरण तुला मी । मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया ॥धृ॥
मंगलमूर्ती तू गण नायक । वक्रतूंड तू सिद्धीविनायक । तुझीया द्वारी आज पातलो ये इच्छित मज धाम ॥१॥
तू सकलाचा भाग्यविधाता तू विद्येचा स्वामीदाता । ज्ञानदिप उजळून आमुचा निववी नैराश्य या ॥२॥
तू माता तू पिता जगीया । ज्ञाता तू सर्वस्व जगी या । पामर स्वर मी उणे भासती । तूच आरती गाया ॥३॥