हरी किर्तन रंगी रंगाया । ये नाचत येरे गणराया, आरंभी तुज आळवीन मी मनोमनी । तूज पूजीन कर जोडूनिया विनवीन । येई पायी पैंजण घालूनिया । ये नाचत येरे गणराया ॥१॥
अंगी शोभे शेंदूराची उटी, वरी भाळी केशर कस्तुरी लल्लाटी । रूद्र माळ शोभे कंठी । रत्नजडीत शिरी घालुनिया । ये नाचत गणराया ॥२॥
या सात स्वरांच्या संगीता मम भाव फुलांनी पसरिता । ये भावे आळविता । भावे मी मुखी आळविता । मजवरी करी कृपेची छाया । ये नाचत येरे गणराया ॥३॥