अक्रुरा नेवू नको गोविंद अक्रुरा नेवू नको गोविंद ॥धृ॥
कंस नृपाते जाऊनी सांगे, पदर पसरीतो नंद ॥१॥
काठी कांबळा घेऊनी हाती नेतो वत्सेवनी गोवृंद ॥२॥
मुकूट कुंडले कौस्तुभमाला, नुपूरे वाजती मंद ॥३॥
म्हणत यशोदा या गोकुळीचा, घालविसी आनंद ॥४॥
कमलनयन या श्रीरंगाचा, निशीदिनी लागे छंद ।
ठेवी कृष्णा हृदय मंदिरी तोडूनीया भवबंध ॥५॥