आले मूळ बाई आता विठू माऊलीचे, माहेरी जायाचे मला माहेरी जायाचे ॥धृ॥
गळा तुळशीमाळ शोभे जसा रत्नहार, बिदीवाणी टिळा शोभे भाळीचा अबीर । कृष्ण नाम कुंडल कानी सहज असे ल्यायाचे ॥१॥
बहिण माझी चंद्रभागा न्हाऊ माखू घालील । हरी किर्तनाचा रंस उटी त्याची लावील करू उदाविण्यासी जाळी धूप विकाराचे ॥२॥
पुंडलिक भाऊराया घेई साडी चोळी, जीर्ण वस्त्र सुखदुःखाचे झाली होती जाळी । भरील हाती कंकण माझ्या अहेवपणाचे ॥३॥
विठा आई विठ्ठल बाप पुरवतील कोड रामनाम घालूनी ओठी मुख करीती गोड, आशीर्वाद घेईन ओटी, पंढरी रायाचे ॥४॥