कडे घागर राधा निघाली पाणीयाला । घड्यावर हात तिचा डोईवर पदर राधा निघाली पाणीयाला ॥धृ॥
यमुनेच्या तीरी राधा भरते घडा । हळूच आला कान्हा त्याने मारल्या खडा ॥१॥
घडा कसा रिता झाला नवलपरी । तशीच राधा घरी गेली ओल्या पदरी ॥२॥
सासू म्हणे का ग राधे उशीर जाहला । काय सांगू सासुबाई घडा फुटला ॥३॥
अनया म्हणे सोड छंद राधे कान्हयाचा । ठाऊक आहे खट्याळ तो सार्या मुलखाचा ॥४॥