देवळातल्या देवा या ही उतरा हो पायरी ॥ थांबली बहिणाबाई दारी, अंगणी देवा प्रकाश उजळे, येथे कीर्तन गायन चाले । रुप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी ॥१॥
बघ येती या संत विभूती, सम चरणावरी ठेवून भक्ती । हरीनामाची होत आरती पाही सोहळा बाहेरी ॥२॥
मी तर आले स्वये न्यावया, भक्ताची ही वेडी माया, स्वये निघावे दर्शन द्याया, टाळ चिपळ्या झंकारती ॥३॥