जय अंबे भवानी नवसाला पाव । मनोहर रूप तुझे लेकराला दाव ॥धृ॥
प्रेम पूजा घेवूनी आले मी द्वारा । नको करू मना येण्या तुझ्या गाभारा ॥१॥
मटकी पंचामृत तुज घालीन स्नाना । विश्व जननी माते देई आशीर्वचन ॥२॥
सत्संगाचा चंदनाचा येई मंद वास । दया क्षमा जाई जुई पुष्पे आणिली खास ॥३॥
वैराग्याचे हळदी कुंकू भाली रेखीव । देई देई माते हाती सतीचे वाण ॥४॥
मनःचक्षु आम्रफल नैवेद्य तुला । मोद भरे पूजन करूनी जीव रमला ॥५॥
प्रेमाश्रुंचे सिंचन करूनी धरते चरणाला । दूर नको लोटू आई तुझ्या कन्येला ॥६॥