लपून बसली राधा गौळण वेडी होऊनी शोधी मोहन, इथे धुंडतो तेथे धुंडतो न मिळे राधा व्यथित हिंडतो । लपल्या जागी हसते राधा श्रीकृष्णाला दुःखी पाहून हळवे झाले मन राधेचे बघवेना ते दुःख हरीचे । हळूच येऊनी नयन झाकेते हरी नाचतो हर्षे न्हाऊन । वेडी राधा वेडी राधा फसवू बघते जगदानंदना । गोपाळांचा बनून सौंगडी लीला नाटक दावी मोहन ।