मधुवन्तीच्या स्वरास्वरातून आळविते मी नाम एकदा दर्शन दे घनःशाम ॥धृ॥
नयनी माझे गोकुळ वसले, यमुनेचे जळ गाली झरले, राधेपरी मी सर्व वाहिले सुख शांतीचे धाम ॥१॥
वसंतातले सरले कूजन, तुझ्याविना हे उदास जीवन, शोधीत तुजला फिरते वणवण नाही जिवा विश्राम ॥२॥
दासी मीरा ये पायाशी घे गिरधारी तव हृदयाशी, या पायाशी मथुराकाशी तीर्थापरी हे नाम ॥ एकदा दर्शन दे ॥३॥