अभंगाची गोडी, करी ज्यास वेडी तोची पुण्य जोडी पंढरीचे ॥धृ॥
टाळ मृदंग वीणा साथ ज्याची भक्ति पाही तोची विठ्ठलाची बघा संत मेळा, सदा रंगलेला तीरी बैसला देवापासी । गाभार्यात कोण उभा विठू जाण, चोखोबा तिष्ठत अंगणात ॥ माहेर आपुले मंदीर तेथले, संत गुंतलेला भजनात ॥ पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा पुण्य पदराला बांधावे हो ॥