कामधाम संसार विसरली हरीभजनी राधिका रंगली ॥धृ॥
गोकुळ वदले राधा वेडी, संसाराची माया तोडी, जगा वेगळे छंद आवडी, कुंजवनी राधिका रंगली ॥१॥
हरीभजनाने तुटले बंधन, मुक्त राधिका झाली पावन, गोकुळ बनले नंदनवन, वाजवितो वनमाळी ॥२॥
आत्मरूप ते रूप हरीचे, मर्म उमजले संसाराचे, धन्य राधिका तिने पाहिली विश्वरुपी मूर्ति सावळी ॥३॥