अंबे तार मला तार शेवंतीचा हार तुला शोभ तसे फार अंबे तार ॥धृ॥
शांती शेवंती दारी लावील्या तोडा केला फार अंबे तार मला तार ॥१॥
मनक मोहाचा दोर आणीला सुई नक्षीदार सुई नक्षीदार ॥२॥
मनक मोहाचे तुरे खोविले आरसे लावीले चार आरसे लावीले चार ॥३॥
मुर्ती सावळी पाहुनी गोजीरी गुंफूनी आणीला हार ॥४॥
दीन दासी मी शरण आले एवढा करी उपकार एवढा करी उपकार अंबे तार शेवंतीचा हार तुला शोभतसे फार ॥५॥