झाले भोजन अंबे आता तांबुल घेऊन आले, या देहाचे पिकले पान त्यासाठी खुडले ॥धृ॥
काम क्रोध मद भस्म करोनी तयार केला चुना । वैराग्याचा रंग केशरी लोभवितो मम मना । स्वान पुरते तव सेवेचे जायफळ घातले ॥१॥
नवविध भक्ती जायपत्रीही, गंधीत करी जो जीवन । क्षमा, शांती वेलदोडे घातले सोडून । दया, माया-केशर कस्तुरी वरच्या वर स्पर्शिले ॥२॥
गंध तयाचा सदैव माझे मन घेई मोहून । संतोषाचे छान रूपेरी वर्ख वरी लाविले ॥३॥
आत्मस्सुतीचे लवंगे मागूनी लाविता मी वरी । तुझ्या मुखाचा दाह करिल का भिति मम अंतरी । टाक काढूनी जगदंबे जर इष्ट तुला वाटले ॥४॥
भक्ती रसाचा त्रयोदश गुणी होता गोविंद । विडा टाक दुःख मम चवर्ण करूनी दाव । सुखीचा कडा काय मागू तुज जग्गन माऊली सारे तू मज दिले ॥५॥