घालीते प्रदक्षणा तुला मोरया द्यावे दर्शन मला ॥धृ॥
सकला आधी तुज त्राता तुज आमुचा मातापिता माधांराचा हार तुला ॥ मोरया ॥१॥
तुम्हासाठी ही दुर्वांकुरजुडी तुम्हासाठी ही दुर्वाकुरजुडी शेला पितांबर घातीली घडी, मोदकाची गोडी तुला मोदकाची गोडी तुला ॥२॥
पंचामृतही पुजा बांधिली आरती तुझी गोड गाईली केशराचा गंध तुला ॥३॥
प्रथम आरंभू तू गणपती रूप पाहता हरपली मती शेंदुराचा रंग तुला ॥ मोरया द्या हो दर्शन मला ॥४॥