काय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा ॥धृ॥
जगा आगळ्या हे कोडे तुम्हां घालितो सांकडे । आगमना अवघ्या अंगा उभा पेटलो श्रीरंगा ॥१॥
बाप गेला आई गेली लोचने ना पाणावली । विवेकास नाही जागा आज भ्यालो या प्रसंगा ॥२॥
शिष्य मागतो समाधी पुत्र मरे बापा आधी । काय म्हणावे या भोगा उलट वाहे पाहू गंगा ॥३॥