विठ्ठल विटेवरी उभा कसा राहे कसा । कमल पुष्पांचा गाभा जसा ॥धृ॥
जनाबाईचे दळण दळीतो । शेणे कुट्याच्या गवर्या लावितो । पद्म हाताचा उमटे ठसा ॥१॥
गोर्या कुंभाराची मडकी घडवितो । एक एक मडकी नक्षी काढितो । थोट्या हाताला बोटे आणितो । भक्तांच्या हाकेला हरी धावे कसा ॥२॥
दामाजीसाठी महार झाला । बंदरासी जाऊनी पैसा ओतिला । चहाडखोर ब्राह्मण फजीत केला बादशहा झाला मग वेडापिसा ॥३॥