शेगांव ग्रामी बसले गजानन, स्मरणे तयाच्या हरतील विघ्न, म्हणूनी स्मरा अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकाच्या मनाचीच पुर्ति । उछिष्ट पात्राप्रती सेवियेंला । नमस्कार माझा ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत, दावियेले सत्य ऐसे हे संत । पाहूनी त्या चकित बंकटलाला झाला । नमस्कास माझा ॥३॥
घेऊनी गेला अपुल्या गृहासी । मनोभावनेने करी पूजनासी । कृपा प्रसादे बहुलाभ झाला । नमस्कार माझा ॥४॥
मरणोन्मुखी तो असे जानरावा । तयांच्यामुळे लाभला त्यास जीव । पदतीर्थ घेता पुर्नजन्म झाला । नमस्कार माझा ॥५॥
पहा शुष्क वापी भरले जलाने । चिलीम पेटविली तये अग्निविणे । चिंचविणे नाशिके करी अमृताला । नमस्कार माझा ॥६॥
ब्रह्मागिरीला असे गर्व मोठा । प्रचारितो अर्थ लावूनी खोटा । क्षणार्धात त्याचा परिहार केला । नमस्कार माझा ॥७॥
बागेप्रती जाती खाण्या कणीस । धुराने करिती मक्षिका त्यास दंश । योगबळे कढिले कंटकाला । नमस्कार माझा ॥८॥
भक्ता प्रति प्रीत करिती अपार । धावूनी जाती तया देती धीर । पुंडलीकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा ॥९॥
बुडताच नौका नर्मदा जलांत धावा करिती गुरुचीची भक्त । स्त्रीवेश घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा ॥१०॥
संसार त्यागीयला बायजाने । गजानन सान्निध्य वाही जिणे । सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा ॥११॥
पितांबर करी भरी उदकांत तुंबा । पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा । गुरुकृपेने तुबां बुडाला । नमस्कार माझा ॥१२॥
हरीतपूर्ण फुटले शुष्क आम्रवृक्ष । पितांबराची घेत गुरु परिक्षा । गुरु कृपा लाभली पितांबराला नमस्कार माझा ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणूनी श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी । हेतु तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा ॥१४॥
बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी । समर्थरूपे दिले दर्शनासी । सज्जनगडाहूनी धावूनी आला । नमस्कार माझा ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियले । भाकर कांदा तुम्ही प्रिय केले । कवरासी पाहूनी आनंद झाला । नमस्कार माझा ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गाडीप्रति दावियेली ही लीला । शरणागती होऊनी तोही आला । नमस्कार माझा ॥१७॥
जाती धर्म नाही तुम्ही पाळीयेला । फकीरासवे हो तुम्ही जेवियेला । दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा ॥१८॥
अग्रवालास सांगे अरे राममूर्ति । अकोल्यास स्थापूनी करी दिव्य किर्ती । शब्दा क्षणी त्या पाह मानियेला नमस्कार माझा ॥१९॥
करंजा पुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दुःख । दुःखातूनी तो पाहा मुक्त झाला । नमस्कार माझा ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्कार रूपी श्री गजाननास । वाहातसे दास गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला ॥२१॥