थोर तुझे उपकार, साई थोर तुझे उपकार ॥धृ॥
भक्तजनांच्या संकटसमयी तूच एक आधार । भक्ति करतां मुक्ति मिळते, ऐसी ख्याती अपार । श्री साईच्या शिर्डी नगरी भक्तगण येती हजार । शतजन्माचा फेरा चुकवूनी मागती तुझाच आधार । स्मरण तुझ्या शिर्डीचे मज होते अनिवार । नित्य वाटते दर्शन घेण्या, यावे वारंवार ॥