काय सांगू रुख्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलानी माझ्या नामा वेडा केला ॥धृ॥
नामा करीना कामधंदा निशीदिनी लागे हरीच्या छंदा कैसे वेडे केले बाळ गोपाळाला ॥१॥
नामा जातो वाळवंटी निशीदिनी हरीचे किर्तन करीती लहान थोर बाळ गोपाळ जमवूनी ॥२॥
टाळ विण्याचा होता गजर, त्याने उठले माझे कपाळ रामकृष्ण मुखी तुम्ही बोला ॥३॥
वेडपट नामा म्हणे गोणाबाई रत्न लाभले तुमच्या पायी केला उद्धार बेचाळीस कुळांचा ॥४॥