तुळसी पिक आले दैव दुणावले, पुर्वीची आहे शेती माझी ॥ आता काय उणे माझीया कुटुंबा पिकली जगदंबा वृदांवनी ॥धृ॥१॥
सोन्याची तुळस मोतीयाच्या मंजुळा, तेथे हा गोविंद क्रिडा करी । तेथे हा गोविंद क्रिडा करी ॥२॥
एक एक तुळसीपान त्रिभुवनी समान, जोडीयेले ध्यान तुका म्हणे ॥ आता ॥३॥