भामेने श्रीहरी दिधले हो दान जन्मोजन्मी पती श्रीभगवान ॥धृ॥
सोळा या सहस्त्र हरीच्या कामिनी इतक्या हो गेल्या भामेच्यासदनी म्हणे भामा आधीदान गेले चक्र पाणी तुला कोणी शिकविले ज्ञान ॥१॥
देवकी गेली भामेच्या सदनी नऊ महिने उदरी वागविले हृदयी तुला कोणी शिकविले ज्ञान ॥ वसुदेव म्हणे नारद ऐका भारोभार सोने तुम्ही झोका सत्य हे वचन प्रमाण ॥२॥
नारद म्हणे दारका भुवनी वजनाला तुलसीचे पान रुख्मीणीने सोडविले भगवान ॥४॥