जोगाई ग अंबाई ग । कुंकूम जोगवा मागते ग, मागते ग मागते ग प्रेमाने भिक्षा घालावे ग ॥धृ॥
प्रभाती मी उठोनी ग अलक्ष टाकोनी झाडीते ग । पंचामृती पूजेस ग । देह हे चंदन घासीते ग । अज्ञानाचा काकडा ग ज्ञान धृतानी उजळीला ग । किंकीणी या मधुनाद ग दाराशी भाट हे गर्जती, तम छेडूनी पातल ग । भ्रांतीचा पडदा सारीते ग ॥धृ॥
थंड उटी सर्वांगी ग । रेणुका माय तू कोमली ग ॥१॥
लिंबलोण ओवाळू ग । देहाची कुरवंडी करीन ग । चरणावरी दूध घटा सूनीर कलश ओतीते गे । तुज प्रती मागते ग । नितकोर भाकर प्रेमाची ॥२॥
नवनित ग आणीले ग । सद्भक्तीने सेवेच ग । अवांगरु केशरी ग । वासांची उटणी स्नानासी ॥३॥
नेत्रघट भरलेले ग । उष्णोदक आणीले तुज साठी ग । मनाच्या ग चौरंगी स्नानाची तयारी तुझी ग । हिरवा चुडा मंगळसरी । चंदेरी पातळ आणीले ग । दुर्वांकुरी कंचुकी ग । नवतीध भक्तीची शिवलींग, पाच फळे ओटीची ग । ओटीत तुझ्या घालीते ग । रत्नप्रभा पसरली । भक्तीचे ग दीप या तबकी ग । हृदयाच्या रौप्या ताटी ज्ञानामृत भोजन घालीते ग । उदंड ग उदंड आयुष्य ग उदंड सौभाग्य मागते उदंड दे जोगवा ग । उदंड कुंकूम मागते ग । उदंड ग उदंड अन्नाचे करी दान । उदंड ग जनसेवा । उदंड हस्ताने करावीं ग ॥