देई मला दर्शन, साई देई मला दर्शन । भावभक्तीने तुझ्या भेटीला आलो मी शरण ॥धृ॥
भक्त जनांची तूच माऊली, तुझ्या कृपेने मिळे साऊली । संकटाच्या वाटेवरती तूच आश्रयस्थान ॥१॥
हांक ऐकता येशि धावूनी, रात्रंदिन भजतो म्हणूनी, तुझ्या दर्शना व्याकुळ झालो, करु नको अवमान ॥२॥