लोटू नको मज दुर कनैया ॥धृ॥
तुझ्या भक्तीचा मनी लोटला सदारंग रसपूर कनैया ॥१॥
पाहा जाहली वेडी बावरी तोल जिवाचा तुच सावरी आळवू किती तुज शामसुंदरा दाटुनी आला उर कन्हैया ॥२॥
सर्वस्वी मी तुझीच राधा, परंतु पुसतो सवाल साधा होशील कारे तुम्ही माझा जाळी जिवा हुरहूर कनैया ॥३॥