गाडी चालली हो गाडी चालली हो, सद्गुरुच्या कृपेची गाडी चालली हो । वेदांची केली चाके चार अठरा डब्यांचा हा आकार । ज्ञानदीप पाजळोनी । बत्ती लावली हो बत्ती लावली हो । जीव शीव रूळावरूनी तीनशे साठ खांद्यावरूनी, दाही दिशांच्या बोगद्यामधूनी गाडी चालली हो ॥ विकल्प फोडूनी बांधला घाट, निश्चयाने केली वाट, भावभक्ती झाली दाट । हरीनामाच्या गजराची शिट्टी वाजली शिट्टी हो वाजली शिट्टी ॥ पाप पुण्य गार्डर पोर्टर नाम तिकीट मास्तर लाल सिग्नल दाखविला, गाडी थांबली हो गाडी चालली हो । संत सज्जन प्रवासी, जाणे त्यांना वैकुंठासी भेटावया त्या प्रभूसी, दृष्टी लागली हो ॥ सद्गुरु ऐसे आमुचे धीट, ईश्वर चरणी नेले, नीट प्याला हरीनामचा धोटा, तहान भागली हो गाडी चालली हो ।