जय जय जय बोला जय ओंकारा ॥धृ॥
संत चरणी दर्शन घेई साक्षीचा इशारा ॥१॥
लींग स्थापना ही ज्याची करूनी पुकारा ॥२॥
जीवनात काय घेई प्रभुचा दुजोरा ॥३॥
गुंतु नको माया जाळी व्याप होई सारा ॥४॥
सगुण निर्गुण तूचि दयेच्या सागरा ॥५॥
आयुष्याचा दोर हाती तुझ्या ओंकारा ॥६॥
काशीश्वरी वास्तव्यही कैलासीच्या हरा ॥७॥
दिनावरी कृपा करा देई तू आसरा ॥८॥