मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २१

संकेत कोश - संख्या २१

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकवीस कल्प - १ कापिल , २ प्राजापत्य , ३ ब्राह्म , ४ सौम्य , ५ सावित्र , ६ बार्हस्पत्य , ७ प्राभासक , ८ माहींद्र , ९ आग्नि , १० जयंत , ११ मारुत , १२ वैष्णव , १३ बहुरूप , १४ ज्योतिष , १५ मायूर , १६ कौर्म , १७ बक , १८ मात्स्य , १९ पाद्य , २० वटकल्प आणि २१ वाराह कल्प . ( चालू असलेला )

एकवीस नांवें तापी ( नदी ) चीं - १ सत्या , २ सत्योद्भवा , ३ श्यामा , ४ कपिला , ५ कापिलांबिका , ६ तापिनी , ७ तपनहरा , ८ नासत्या , ९ नासिकोद्भवा , १० सावित्री , ११ सहस्त्रकरा , १२ सनका , १३ अमृतवाहिनी , १४ सुषुम्ना , १५ सूक्ष्मरमणा , १६ सर्पासर्पविषापहा , १७ तिग्मा , १८ तिग्मरसा , १९ तारा , २० ताम्रा व २१ तापी . ( तापी . म . अ . २ )

एकवीस नांवें बिल्ववृक्षाचीं - १ बिल्व , २ मालूर , ३ श्रीफल , ४ शाण्डिल्य , ५ शैलक , ६ शिव , ७ पुण्य , ८ शिवप्रद , ९ देवावास , १० तीर्थवेद , ११ पापघ्न , १२ कोमलच्छद , १३ जय , १४ विजय , १५ विष्णु , १६ त्रिनयन , १७ वैर , १८ धूम्राक्ष , १९ शुक्लवर्ण , २० संयमी आणि २१ श्राद्धदेवक . ( कल्याण मासिक )

एकवीस नांवें सूर्यदेवतेचीं - १ विकर्तन , २ विवस्वान ‌‍ ३ मार्तेड , ४ भास्कर , ५ रवि , ६ लोकप्रकाशक , ७ श्रीमान् ‌‍, ८ लोकचक्षु , ९ महेश्वर , १० लोकसाक्षी , ११ त्रिलोकेश , १२ कर्ता , १३ हर्ता , १४ तमिस्त्रहा , १५ तपन , १६ तापन , १७ शुचि , १८ सप्ताश्चवाहन , १९ गमस्तिहस्त , २० ब्रह्मा आणि २१ सर्वदेवनमस्कृत . " एकविंशतिरित्येष स्तव इष्टः सदा रवेः " ( मार्कंडेय पु . ३१ - ३१३३ )

एकवीस पत्री गणेशपूजेचीं - १ मालती , ६ माका , ३ बेल , ४ दूर्वा , ५ बोर , ६ धोतरा , ७ तुळस , ८ आघाडा , ९ शमी , १० केवडाअ , ११ कण्हेर , १२ आपटा , १३ मांदार , १४ अर्जुन ( जास्वंद ० , १५ विष्णुक्रांत , १६ डाळिंबी , १७ देवदार , १८ मरवा , १९ निर्गुडी , २० जाई आणि २१ अगास्ति ( हादगा ). ( पूजेचे मंत्र )

एकवीस प्रकारचीं दुःखें - १ शरीर , ६ इंद्रियें , ६ बुद्धि , ६ विषय , १ सुख व १ दुःख , अशीं एक वीस प्रकारची दुःखी . या दुःखांचा नाश हाच पुरुषार्थ असें वैशेषिक शास्त्र मानतें . ( दर्शन मंद्राकिनी )

एकवीस प्रधान गणपतिक्षेत्रें - १ मोरगांव ( जिल्हा - पुणें ), १ काशी , ३ प्रयाग , ४ कदंबपूर ( वर्‍हाड ), ५ श्रीक्षेत्र अदोष ( नागपूर जवळ ), ६ पल्लीपूर ( सिंधप्रांत ), ७ पारिनेर ( उज्जैयिनी जवळ ) ८ गंगा मसलें ( सेलू स्टेशनपासून १५ मैलांवर ), ९ राक्षसभुवन , १० थेऊर

( जि . पुणें ), ११ सिद्धटेक ( दौंड जवळ ), १२ रांजणगांव ( जिल्हा पुणें ), १३ विजयपूर , ( आंध्राप्रांत ), १४ कश्यपाश्रम क्षेत्र ( काशीजवळ ), १५ गणेशपूर क्षेत्र ( बंगाल ), १६ लेण्याद्रि ( जुन्नर जवळ ), १७ वेरूळ , १८ पद्मालय ( खानदेश म्हसावद स्टेशनपासून ५ मैलांवर ), १९ अमलाश्रम क्षेत्र ( बीडजवळ ), २० गणपतीचे राजूर ( जालन्याजवळ ) आणि २१ श्चेत विघ्नेश क्षेत्र ( कुंभकोणाम् ‌‍ जवळ कावेरीतीरीं ). ( एकविंशति - गणेश - क्षेत्र - महिमा )

एकवीस प्रथम श्रेणीच्या तारका - १ शालिनी ( व्याध ), २ अगास्ति , ३ मित्र , ४ अभिजित ‌‍ , ५ ब्रह्म , ६ स्वाति , ७ राजन्य , ८ सरमा , ९ अग्रिम , १० मित्रक , ११ श्रवण , १२ काक्षि , १३ त्रिशंकू , १४ रोहिणी , १५ पुनर्वसु ( प्लक्ष ), १६ चित्रा , १७ ज्येष्ठ , १८ मीनास्य , १९ सोहं ( हंस ),

२० मघा आणि २१ क्रतु . " अवश्यं लक्षणीया हि एकविंशतितारकाः । " ( तारका नगरी )

एकवीस मृत्युलोकींचीं रत्नें - १ माणिक अथवा पद्मराग , २ मोतीं , ३ प्रवाल , ४ मरकतमणि , ५ पुष्पराग , ६ वज्रमणि , ७ इंद्रनील मणि , ८ मेदकमणि ( गोमेदक ), ९ सूत्रमणि ( लसणी ), १० वैडूर्यमणि , ११ चंद्रकांतमणि , १२ घृतमणि , १३ तैलमणि , १४ भौष्मकमणि , १५ अमृतमणि १६ उपलकमणि ( ओपल ), १७ पारसमणि , १८ जलूकामणि , १९ लाजावर्तमणि , २० मासरमणि आणि २१ भीष्मकपाषाण अथवा मणि हीं सर्व एकवीस रत्नें देवदानव युद्धांत पडलेल्या राजा बलीच्या निरनिराळ्या अंगापासून उत्पन्न झालीं अशी कथा आहे . ( रत्नदीपिका )

एकवीस भूर्च्छना ( संगीतशास्त्र )- ( अ ) १ उत्तरमन्द्रा , २ रजनी , ३ उत्तरायता , ४ शुद्ध षड्‌‍जा , ५ मत्सरीकृता , ६ अश्वक्रान्ता , ७ अभिरुद्रता , ८ सौवीरी , ९ हरिणाश्वा , १० कलोपनता , ११ शुद्धमध्या , ११२ मागीं , १३ पौरवी , १४ ह्रश्यका , १५ नन्दा , १६ विशाला . १७ सुमुखी , १८ चित्र ( विचित्रा ), १९ चित्रावती ( मोहिनी ), २ - सुरवा आणि २१ आलापा ( आलापन ). ( सुरतरंगिणी ). सप्त स्वरांचा आरोह अवरोह करणें त्यास अथवाअ त्या स्वरसमुदायांस मूर्च्छना म्हणतात . ( रागविलास ). " सप्त स्वरास्त्रयो ग्रामा मूर्च्छना एकविंशतिः । "

( नारदीय पूर्वखंड ) ( आ ) १ नंदा , २ विशाला , ३ सुमुखी , ४ चित्रा , ५ चित्रवती , ६ सुरवाअ आणि ७ बला या सात ( देवतांच्या ) मूर्च्छना , ८ अप्यावती , ९ विश्वभृता , १० चंद्रा , ११ हेमा , १२ कपर्दिनी , १३ मैत्री व १४ बार्हती या सात ( पितरांच्या ) मूर्च्छना आणि १५ उत्तरचंद्र , १६ अभिरुढता , १७ अश्चक्रांता , १८ सौवीरा , १९ हृषिका , २० उत्तरायता आणि २१ रजनी , या सात ऋषींच्या होत . गंधर्वगण देवतांच्या मूर्च्छनांचा स्वीकार करतात व मानव ऋषींच्या मूर्च्छना घेतात .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP