मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १०

संकेत कोश - संख्या १०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


दश आयुधें ( देवीचीं ) ( अ )- १ खड्‌‍ग , २ बाण , ३ गदा , ४ शूल , ५ शंख , ६ चक्र , ७ भुशुंडी , ८ परिघ , ९ कार्मुक आणि १० रुधिरपात्र .

( सप्तशती १ - १ ); ( आ ) ( शंकराचीं ) १ खड्‌ग २ त्रिशूल , ३ परशु , ४ शंख , ५ डमरू , ६ नागपाश , ७ अक्षमाला , ८ धनुप्य , ( पिनाक ), ९ शर आणि १० पाशुपत ( क . क . )

दशेंद्रियें व त्यांच्या देवता -( पंज्च कर्मेंद्रियें )- १ हात - इंद्र , २ पाय - त्रिविक्रम , ३ वाणी - अग्नि , ४ उपस्थ - प्रज्ञापति व ५ गुद - यम

( मृत्यु )

( पंच ज्ञानेद्रियें )- १ कान - दिशा , २ त्वचा - वायु , ३ डोळे - सूर्य , ४ जिव्हा - वरूण , आणि ५ नाक - अश्चिनीकुमार ( सर्ववेदान्तसिद्धान्तसार - संग्रह )

दश कला अग्नीच्या - १ धूम्रा , २ नीलवर्णा , ३ कपिला , ४ विस्फुलिङि‌‌गनी , ५ ज्वाला , ६ हैमवती , ७ कव्यवाहिनी ८ हव्यवाहिनी , ९ रौद्री व १० संकर्षिणी . अशा वैश्वानराच्या दहा कला आहेत .

" रौद्री संकर्षिणी चैव वैश्वानरकला दश " ( ज्ञानार्णवतंत्रम् ‌‍ )

दश कामदशा - १ अभिलाषा , २ चिंता , ३ स्मृति , ४ गुणकीर्तन , ५ दद्वेश , ६ प्रलाप , ७ उन्माद , ८ व्याधि , ९ जडता व १० मरण ,

अभिलाषोऽथ चिंता स्यात्स्मृतिश्च गुणकीर्तनम् ‌‍ ।

उद्वेगोऽथ प्रलापः स्यादुन्मादो व्याधिरेव च ॥

जडता मरणं चैव दशमं जायते धरुवम् ‌‍ ( शृंगार तिलक )

दशग्रंथ ( अ ) - १ संहिता , २ पद , ३ क्रम , ४ ब्राह्मण , ५ व्याकरण , ६ शिक्षा , ७ कल्प , ८ ज्योतिष , ९ छंद व १० निरुक्त ; ( आ ) १ संहिता , २ ब्राह्मण , ३ आरण्यक , ४ शिक्षा , ५ कल्प , ६ व्याकरण , ७ निघंटु , ८ निरुक्त , ९ छंद व १० ज्योतिष . या वेद व त्यांचीं उपांगें असलेल्या दहा ग्रंथांस दशग्रंथ म्हणतात .

छन्दस्तु नवमः प्रोक्तो ज्योतिषो दशमः स्मृतः ।

प्रोक्ता एते दशग्रंथाःअ व्याडिनैव महर्षिणा ॥ ( सु . )

दशदशा ( जीवाच्या )- १ गर्मवास , २ जन्म , ३ बाल्य , ४ कौमार , ५ पौगण्ड , ६ यौवन , ७ स्थावीर्य , ८ जरा , ९ प्राणरोध आणि १० नाश .

दशदिशा व त्यांच्या देवता - १ पूर्व - इंद्र , २ पश्चिम - वरुण , ३ उत्तर - कुवेर , ४ दक्षिण - यम , ५ ईशान्य - ईश , ६ नैऋत्य - निऋति , ७ वायव्य - वायु , ८ आग्नेय - अग्नि , ९ ऊर्ध्व - ब्रह्मा व १० अधोदिशा - शेषनाग .

दशदानें - १ गाय , २ भूमि , ३ तीळ , ४ सुवर्ण , ५ तूप , ६ वस्त्र , ७ धान्य , ८ गूल , ९ लवण व १० गृह . हीं दशदानें होत .

दशांगें ( वृक्षांचीं )- १ मूळ , २ साल , ३ पान , ४ फूल , ५ फळ , ६ बोखी , ७ चीक , ८ नार , ९ कांटे व १० देठ पानांचा किंवा फुलांचा .

दशांगघूप - ( अ ) १ कोष्ठ , २ गूल , ३ लाख , ४ हरीतकी , ५ राळ , ६ जटामांसी , ७ शिलारस , ८ साखर , ९ मोथ व १० गुग्गुळ ; ( आ ) १ नखला , २ वाळा , ३ चंदन , ४ ऊद , ५ विशेष , ६ आगरु , ७ तूप , ८ कापूर , ९ मध आणि १० गुलाबाचीं फुलें , या दहा सुगंधी द्र्व्यांच्या मिश्रणानें तयार होणारा धूप . ( दुर्बोध श . को . ); ( इ ) १ कृष्णागरु , २ चंदन , ३ गुग्गुळ , ४ श्वेतागरु , ५ लाख , ६ बेलफळ , ७ तूप , ८ मध , ९ सर्जरस आणि १० कापूर , हीं दहा धूपाचीं साधनें होत .

’ साधनानि दशांगानि धूपश्च चतुरानन । ( वी . प्र . )

दश नाडया - १ इडा , २ पिंगला , ३ सुषुम्ना , ४ गांधारी , ५ हस्तिजिह्ला , ६ पूषा , ७ यशस्विनी , ८ अलम्बुषा , ९ कुहू व १० शंखिनी . ( आ )

१ इडा , २ पिंगला , ३ सुषुम्ना , ४ गांधारी , ५ जीवनी , ६ दशतुंडी , ७ दीक्षा , ८ बाणदशा , ९ शंखिनी व १० सौक्षिणी ( म . वा . को . )

मानव शरिरांत एकंदर बहात्तर सह्स्त्र नाडया असून त्यांत प्राणवहा अशा प्रधान बहात्तर नाडया आहेत , त्यांत या दशनाडया मुख्य होत . ’ चक्रवत्संस्थिता होताः प्रधाना दश नाडयः ’ ( अग्नि . २१४ - ३ )

दश नामें पुल्लिंगी प्रतीकात्मक ( संस्कृत )-

रामो हरिःकरी भूभृत् ‌ । भानुःकर्ता च चंच्रमाः ।

तस्थिवान् ‌ भगवान् ‌ आत्मा । दशैते पुंसि नायकाः ॥

दश नामें स्त्रीलिंगी प्रतीकात्मक ( संस्कृत )-

रमा रुचिर्नदी धेनुर्वाग्धीः सरित् ‌‍ अनन्तरम् ‌ ।

क्षुत् ‌‍ प्रावृट् ‌‍ च शरद ‌‌ चैव दशैताः स्त्रीषु नायकाः ॥

दश नामें नपुंसकलिंगी प्रतीकात्मक ( संस्कृत )-

ज्ञानं दधिः पयो वर्म धनुर्वारि जगत् ‌‍ तथा ।

मधु नाम मनोहारि दशैतानि नपूंसके ॥

दशनाम संन्यासी - १ गिरी , २ पुरी , ३ पर्वत , ४ सागर , ५ बन , ६ तीर्थ , ७ भारती , ८ सरस्वती , ९ अरण्य आणि १० आश्रम .

( दर्शनप्रकाश )

दश पारमिता ( बुद्धीची परिपूर्णता )- १ दान , २ शील , ३ नैष्कर्म्य , ४ प्रज्ञा , ५ वीर्य , ६ क्षांति , ७ सत्य , ८ अधिष्ठान , ९ मैत्री व १० उपेक्षा . या दहा पारमिता म्हणजे गुणांची पूर्णता किंवा पराकाष्ठा बुद्ध धर्मांत मानिल्या आहेत . ( बुद्धधर्म )

दशधर्म - १ क्षमा , २ मार्दव , ३ आर्जव , ४ सत्य , ५ शौच , ६ संयम , ७ तप , ८ त्याग , ९ आकिंचन्य व १० ब्रह्मचर्य . ही दहा धर्माचीं अंगें होत . ( जैन धर्म )

दशभक्ति - १ सिद्धभक्ति , २ श्रुतभक्ति , ३ चारित्र्यभक्ति , ४ योगी भक्ति , ५ आचार्य , ६ निर्वाण , ७ पंचपरमेष्ठी , ८ तीर्थंकरभक्ति . ९ नंदीश्वरभक्ति , १० शांतिभक्ति , असे दहा प्रकार जैन धर्मांत मानले आहेत . ( दशभक्ति )

दश महादनें - १ सुवर्ण , २ अश्व , ३ तीळ , ४ हत्ती , ५ दासी , ६ रथ , ७ भूमि , ८ घर , ९ कन्या आणि १० कपिला धेनू . या दहा वस्तूंपैकीं कोणत्याहि वस्तूचें दान तें महादान म्हणून मानलें जातें .

कनकाश्चतिला नागदासीरथमहीगृहाः ।

कन्या च कपिला धेनुर्महादानानि वै दश ॥ ( अग्नि २०९ - २४ )

दश महाविद्या - १ काली , २ तारा , ३ षोडशी , ४ भुवनेश्चरी , ५ मैरवी , ६ छिन्नमस्ता , ७ धूमवती , ८ बगला , ९ मातंगी आणि १० कमला . या दहा महाविद्या म्हणून शक्ति उपासनेंत सांगितल्या आहेत . ( कल्याण शक्ति अंक )

दश मुळें - ( अ ) १ शालिपणीं ( रानगांजा ), २ पुष्टिपणीं , ३ रिंगणी , ४ डोरली , ५ गोखरू , ६ बिल्व , ७ ऐरण ( टाहाकळा ), ८ टेंटू , ९ पहाडमूळ व १० शिवणमूळ ; ( आ ) १ बेल , २ टाकळा , ३ टेटू , ४ शिवण , ५ पाडळ , ६ सालवण , ७ गोखरू , ८ पिठवण , ९ डोरली व १० रिंगण . या दहा वनस्पतींचीं मुळें यांचा आर्य वैद्यकांत उपयोग करतात .

दशामृत - १ दहीं , २ दूध , ३ मध , ४ तूप , ५ साखर , ६ सुंठ , ७ जिरे , ८ सेंदेलोण , ९ वेलदोडे व १० मिरे . या पदार्थांच्या मिश्रणास दशामृत म्हणतात . अशी दशामृत पूजा वीरशैवांस विहित आहे . ( सि . पु . )

दशमान पद्धति - एक परिमाण पद्धति . हींत परिमाणें दसपटीनें चढत किंवा उतरत जातात . हीं आतां भारतांत नव्यानें रूढ करण्यांत आली आहेत . प्राचीन काळीं देखील एकम् ‌‍ दहम ‌, शतम् ‌‍ अशी दसपटीनें संक्या मापली जात असे .

दश रूपकें ( द्दश्य काव्य प्रकार )- १ नाटक , २ प्रकरण , ३ भाण , ४ व्यायोग , ५ समवकार , ६ डिम , ७ ईहामृग , ८ अंक , ९ वीथि आणि १० प्रहसन , असे नाटयाचे संस्कृत वाङ्‌‍मयांतले दहा प्रकार . ( भ . ना . १८ - २ - ३ )

दश लक्षणें खर्‍या ज्ञानाचीं - १ अक्रोध , २ वैराग्य , ३ ईद्रियनिग्रह , ४ क्षमा , ५ दया , ६ शांति , ७ लोकप्रेम , ८ औदार्य , ९ एखाद्याचें भय निवारण व १० दुःख परिहार करणें .

अक्रोध - वैराग्य - जितेंद्रियत्वं । क्षमा - दया - शांति - जनप्रियत्वं ।

निलोंभदाने भयशोकहानिः । ज्ञानस्य चिह्लं दश लक्षणानि च ॥ ( योग तत्त्वमृत )

दशलक्षणें भागवण पुराणाचीं - १ सर्ग - संसार , २ विसर्ग - संहार , ३ स्थान - वैकुंठ , ४ पोषण - भगवद्भजन , ५ ऊति - कर्मानुसार होणारी वासना , ६ मन्वन्तरें - चौदा मनूंची व्यवस्थिति , ७ ईशानुकथन - दशावतारचरित , ८ निरोध - एकाग्रता , ९ मुक्ति - ज्ञानयोग , १० आश्रय - सर्व प्रकाशक परमात्मा . सर्व पुराणें पंचलक्षणात्मक ; पण भागवत पुराण दशलक्षणात्मक आहे . दशलक्षणांनी तें महापुराण व पांच लक्षणांनीं युक्त तें उपपुराण - अशी सर्वसाधारणपणें व्यवस्था आहे . ( भाग . १२ - ७ )

सर्ग , विसर्ग , स्थान , पोषण । ऊति मन्वन्तरें ईशानुकथन ।

निरोध मुक्ति आश्रयपूर्ण । एवं द्श लक्षण भागवत ॥ ( चतुःश्लोकी भागवत )

दशवायु - १ प्राण , २ अपान , ३ व्यान , ४ उदान , ५ समान , हे पिंडीचे व ६ नाग , ७ कूर्म , ८ कृकळ , ९ देवदत्त आणि १० धनंजय . हे ब्रह्मांडीचे . ( दासबोध )

दशविघ्नें ( योगाला )- १ आळस , २ व्याधिपीडा , ३ प्रमाद , ४ संशय , ५ अनवस्थितचित्त , ६ अश्रद्धा , ७ भ्रान्तिदर्शन , ८ दुःख , ९ दौर्मनस्य ( इच्छा सफाल न झाल्यामुळें मन क्षुब्ध होणें ) आणि १० अयोग्य विषयासंबंधानें लोलुपता . ( लिंग . ९ - ४ )

दशोपनिषदें - १ ईश , २ केन , ३ कठ , ४ प्रश्न , ५ मुण्ड , ६ माण्डुक्य , ७ तैत्तिरीय , ८ ऐतरेय , ९ छांदोग्य आणि १० बृहादारण्यक .

दशावतार व त्यांच्या जयंत्या - १ मस्त्य - चैत्र शु . ३ प्राह्लीं , २ कूर्म - वैशाख शु , १५ सायंकाळीं , ३ वराह - भाद्रपद शु . ३ प्राह्लीं , ४ नृसिंह - वैशाख शु . १४ सायंकाळीं , ५ वामन - भाद्रपद शु . १२ मघ्याह्लीं , ६ परशुराम - वैशाख शु . ३ सायंकाळीं , ७ राम - चैत्र शु . ९ मघ्याह्लीं , ८ कृष्ण - श्रावण व . ८ मघ्यरात्रीं , ९ बौद्ध - आश्चिन शु . १० सायंकाळीं . १० कल्की - श्रावण शु . ६ सायंकाळीं . ( धर्मसिंधु ) ( म . भा . शांति . अ . ३३९ )

दशविध द्विदल धाग्यें - १ चणक , २ मसूर , ३ मूग , ४ उडीद , ५ लाख , ६ वाटाणे , ७ तूर , ८ वाल , ९ चवळी व १० कुळीथ .

दशविध नाद - २ चिनचिनी नाद , २ शिंगी नाद , ३ तंती नाद , ४ ताळ नाद , ५ सुस्वर नाद , ६ गर्जना नाद , ७ शंख नाद , ८ घोष नाद , ९ भेरी नाद , १० मेघ नाद . असे दहा प्रकारचे नाद साधकांस कोटी जप पूर्ण झाल्यावर ऐकूं येतात व नादाचा अनुभव येतो असें योगशास्त्रांत सांगितले आहे . ’ दशमो मेघनाद ; ( हंसोपनिषत् ‌‍ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP