मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २८

संकेत कोश - संख्या २८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अठ्ठावीस नक्षत्राधिपति - १ दस्त्र ( अश्चिनीकुमार ), २ यम , ३ अग्नि , ४ ब्रह्मा , ५ चंद्र , ६ शिव , ७ अदिति , ८ गुर , ९ सर्प , १० पितर , ११ मग , १२ अर्यमा , १३ सूर्य , १४ विश्वकर्मा , १५ वायु , १६ अग्नि , १७ मित्र , १८ इंद्र , १९ राक्षस , २० जल , २१ विश्वेदेव , २२ विष्णु , २३ वसु , २४ वरुण २५ अजैकपाद , २६ अहिर्बुघ्न्य आणि २८ पूषा , हे अठ्ठवीस नक्षत्रांचे अधिपति होत .

अठ्ठावीस योगेश्वर - १ श्वेत , २ सुतार , ३ मदन , ४ सुहोत्र , ५ कंकण , ६ लोगाक्षि , ७ जैगीषव्य , ८ दधिवादन , ९ ऋषभ , १० मुनि , ११ उग्र , १२ अत्रि , १३ सुबलाक , १४ गौतम , १५ वेदशीर्ष , १६ गोकर्ण , १७ गुप्तपासी , १८ शिखंडमृत , १९ जटामाली , २० अट्टाहास , २१ दारुक , २२ लांगली , २३ महाकाय मुनि , २४ शूली , २५ मुंडिश्वर , २६ सहिष्णु , २७ सोमशर्मा आणि २८ नकुलीश .

सहिष्णुः सोमशर्मा च नकुलीश्वर एव च ।

अष्टाविंशतिसंख्याका योगाचार्या युगक्रमात् ‌‍ ॥ ( शिवमहापुराण वायवीय संहिता )

अठ्ठावीस व्यास - १ ब्रह्मदेव , २ मनु , ३ उशना , ४ वृहस्पति , ५ सूर्य , ६ मृत्यु , ७ इन्द्र , ८ वसिष्ठ , ९ सारस्वत , १० त्रिधामा , ११ त्रिवृषा , १२ भरद्वाज , १३ अन्तरिक्ष , १४ वप्री , १५ त्रय्यारुण , १६ धनंजय , १७ कृतञ्जय , १८ क्रणज्य , १९ भारद्वाज , २० गौतम , २१ उत्तम ( हर्यात्मा ), २२ वेनराजस्त्रव , २३ तृणबिंदु , २४ भार्गवऋक्ष , २५ शक्ति , २६ पराशर , २७ जातुकर्ण व २८ कृष्णद्वैपायन . असे अठ्ठावीस व्यास होऊन गेले .

अष्टविंशतिरित्येते वेदव्यासाः पुरातनाः । ( विष्णु अंश ३ अ . ३ )

अठ्ठावीस शुभाशुभ योग - १ आनंद , २ कालदंड , ३ धूम्र , ४ धाता , ५ सौम्य , ६ ध्वांक्ष , ७ ध्वज , ८ श्रीवत्स , ९ वज्र , १० मुद्गर , ११ छत्र , १२ मित्र , १३ मानस , १४ परम , १५ लंबक , १६ उत्पात , १७ मृत्यु , १८ कोण , १९ सिद्धि , २० शुभ , २१ अमृत , २२ मुसल , २३ गद , २४ मातंग ( कुंजर ) २५ राक्षस , २६ चर , २७ स्थिर आणि २८ वर्धमान . " स्थिरः प्रवर्धमानश्च योगाष्टाविंशतिक्रमात ‌ " ( ज्योतिष )

अठ्ठावीस शैवागम - श्रीशिवाच्या पांच मुखापासून आविर्भूत झालेले शैवधर्माचे सिद्धांतग्रंथ , यांस शैवागम म्हणतात , ते असे - १ सद्योजात - १ कायिक , २ योगज , ३ चिन्त्य , ४ कारण व ५ अजित . २ वामदेव - ६ दीप्त , ७ सूक्ष्म , ८ सहस्त्र , ९ अंशुमान् ‌‍ व १० सुप्रमेद , ३अघोर - ११ विजय , १२ निःश्वास , १३ स्वायम्भुव , १४ अनंत व १५ वीर . ४ तत्पुरुष - १६ रौरव , १७ मुगुट , १८ विमल , १९ चन्द्रज्ञान , २० बिम्ब , व ५ ईशान - २१ प्रोद्नीत , २२ ललित , २३ सिद्ध , २४ सन्तान , २५ सर्वोत्तर , २६ परमेश्वर , २७ किरण आणि २८ बातुल .

( भारतीय वास्तुशास्त्र प्रतिमा - विज्ञान )

अठ्ठावीस साधूचीं लक्षणें - १ दयालुत्व , २ अद्रोह , ३ तितिक्षा ( सहनशीलता ), ४ सत्य , ५ अनघ ( पवित्र ), ६ समबुद्धि , ७ परोपकार , ८ अकामता , ९ बाह्मेंद्रियनिग्रह , १० कनवाळुपणा , ११ स्वकर्माचरण , १२ अकिंचनता , १३ निरिच्छ , १४ मितभोजन , १५ शांति , १६ स्थिरता , १७ परमेश्वराला शरण जाणें , १८ मननशीलता , १९ सावधानता , २० गांभीर्य , २१ धैर्य , २२ षड्‌‍विकारांवर जय , २३ निरभिमानता . २४ प्राणिमात्राविषयीं सद्‌‍भाव , २५ परबोधकता , २६ निष्कपटता २७ कारुणिकता आणि २८ वेदशास्त्ररहस्यांचें ज्ञान .

कवि या पदाचे व्याख्यानें । झाली अठ्ठावीस लक्षणें ।

उरलीं जे अति गहनें । तें दो श्लोकी कृष्णें आदरिलें सांगो ॥ ( ए . भा . ११ - १०५० )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP