मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २०

संकेत कोश - संख्या २०

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


वीस अक्षरी मंत्र - मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥ हा महाराष्ट्राचा संघटना मंत्र . ( श्रीसमर्थ )

वीस धर्मशास्त्रप्रवर्तक - १ मनु , २ अत्रि , ३ विष्णु , ४ हारीत , ५ याज्ञवल्क्य , ६ उशना , ७ अंगिरा , ८ यम , ९ आपस्तंब , १० संवर्त , ११ कात्यायन , १२ बृहस्पति , १३ पराशर , १४ व्यास , १५ शंख , १६ लिखित , १७ दक्ष , १८ गौतम , १९ शतातप आणि २० वसिष्ठ . हे धर्मशास्त्रकर्ते होत . " शतातपो वसिष्ठश्च धर्मशास्त्रप्रयोजकाः " । ( स्मृति )

वीस स्मृति ग्रंथ - प्राचीन ऋषींनीं केलेले धर्मशास्त्रविवेचक असे अनेक स्मृतिग्रंथ होत . १ मनु , २ याज्ञवल्क्य , ३ बृहस्पति , ४ विष्णु , ५ वसिष्ठ , ६ गौतम , ७ व्यास , ८ बौधायन , ९ शंख व लिखित , १० अत्रि , ११ हारीत , १२ उशना , १३ अंगिरा , १४ यम , १५ आपस्तंब , १६ संवर्त , १७ कात्यायन , १८ पराशर , १९ द्क्ष व २० शतातप स्मृति .

वीस उपस्मृतिकार - १ अंगिरस , २ अत्रि , ३ आपस्तंब , ४ औशनस , ५ गोभिल , ६ पक्ष , ७ देवल , ८ प्रजापति , ९ वृहस्पति , १० यम , ११ विष्णु , १२ शंख , १३ शतातप , १४ हारीत , १५ अश्वलायन , १६ लिखित , १७ वसिष्ठ , १८ व्यास , १९ संवर्त आणि २० बौधायन . ( स्मृतिसमुच्चय )

वीस कुलें वनस्पतींचीं - १ सीताफळ , २ मोहरी , ३ कार्पास , ४ नारंग , ५ शिंबा , ६ गुलाब , ७ जंबू , ८ कूष्मांड , ९ कुसुम , १० जाती , ११ करवीर , १२ धत्तुर , १३ तुलसी , १४ औदुंबर , १५ एरंड , १६ नारिकेल , १७ कुमारी , १८ कदली , १९ नागदन आणि २० तृणधान्य कुल ,

वीस भाव अथवा विकार सर्व भूतांचे ठायीं असलेले - १ बुद्धि , २ ज्ञान , ३ असंमोह , ४ क्षमा , ५ सत्य , ६ दम , ७ शम , ८ मुख , ९ दुःख , १० भव , ११ अभाव , १२ भय , १३ अभय , १४ अहिंसा , १५ समता , १६ संतोष , १७ तप , १८ दान १९ यशं आणि २० अपयश ( भ . गी . १० - ४५ )

वीस लक्षणें समर्थसांप्रदायाचीं - १ लेखन , २ वाचन , ३ अर्थांतर सांगणें , ४ आशंका निवृत्ति , ५ प्रचीति , ६ गायन , ७ नर्तन , ८ टाळीं वाजविणें , ९ अर्थभेद , १० प्रबंध , ११ प्रबोध , १२ वैराग्य , १३ विवेक , १४ लोक राजी राखणें , १५ राजकारण , १६ अव्यग्रता , १७ प्रंसग जाणणें , १८ वृत्ति उदासीन , १९ समता व २० राम उपासना ( श्री समर्थांचा गाथा )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP